Saturday, January 15, 2011

खर्डेघाशी : इष्टार्ट !!!!

दिसामाजी काहीतरी खर्डावे..नाही लिहावे असे रामदास स्वामी म्हणून (लिहून ) गेले. मला  ही लेखनाची खुप आवड होती. म्हणजे शालेत असताना मी वर्गातल्या फल्यावर सुविचार लिहायचो. (त्यांमागे प्रथानेला बाहेर उभे रहायला लागायचे नहीं हा स्वार्थ होता ही गोष्ट निराळी) नंतर कधीतरी अचानक (हो अचानकच) कविता करायला लागलो. ( इथे अचानक हा शब्द योग्य वाटतो कारन जसे लक्ख उन पडलेले असताना अचानक ढग जामुन पाउस पडतो तसा मी अगदी ढग ही न जमता अचानक कविता करायला लागलो) पण तय सोडून इंजीनियरिंगच्या चार वर्षात जर्नल सोडून काही लिहिले नाही. (म्हणजे साहित्य वैगेरे ज्याला म्हणतात तसले काही, आणि इंजीनियरिंग चे जर्नल साहित्य प्रकारात नक्कीच मोड़त नसावे नाही तर एकत्र बायन्डिंग केल्यास चार वर्षात प्रत्येक इंजिनियर च्या जर्नल्स्च्या  चार पाच कादंबर्या सहजच होऊ शकतील ) तर असो ही सगळी पार्श्वभूमी देण्यास कारण की ( हे पत्रास कारण की प्रमाणे वाचावे) आता मी सिरियसली लिहायचे ठरवले आहे ( सिरियस व्हायचे नाही ) . स्पष्टच सांगायचे तर याला खर्डेघाशी म्हणणे योग्य ठरेल .म्हणजे कथा कादंबर्या वैगेरे निवांत लिहीनच पण त्याआधी  पुलंनी लिहिल्या प्रमाणे नव साहित्यिकसाठी आत्मपरिचय लिहिणे महत्वाचे ठरते . आत्मपरिचय तयार पाहिजे . मार्गदर्शन पर पुलंचे 'ललित आत्मपरिचय कसे लिहावे : एक मार्गदर्शन ' वाचलेले आहेच. आणि त्यातले उद्धट पणा हा दुर्गूण नसून आत्म प्रकति करणाचे ठळक वैशिष्ट आहे हे मला मनापासून पटले आहे . तर असो आत्म परिचयपर एक दोन ओळी आता यायलाच हव्यात. लिहितो . तर मी पद्धतशीर लेखक नाही, कलाकार तर त्याहून  नाही.  मी उथळ आहे. आणि म्हणुनच माझ्या खर्डेघाशीत काही खोलवर दडलेला अर्थ वैगेरे शोधण्याचा प्रयत्न फोल ठरावा . पोटासाठी लिहिणारे काहीजण असतात , पोट तिडकीने लिहिणारे अनेक जण  असतात , मी पोट भरलेले आहे म्हणून लिहिणारा आहे हे कृपया सयंमशील वाचकांनी ( म्हणजे इथे पर्यंत वाचत कोणी पोचले असल्यास , किंवा इथे पर्यंत 'वाचून' कोणी 'वाचले' असल्यास) लक्षात घ्यावे . तर मी के लिहायचे हे अद्याप ठरवले नाही पण माझे जनरल नॉलेज तसे जनरलच असल्याने आणि फेसबुक वरील स्टेटस सोडून हल्ली लोक काय लिहितात  ते मी वाचत नसल्याने माझी खर्डेघाशी एकतर कालाच्या मागे असेल किंवा कलायच्या पलीकडील असेल हे मात्र नक्की ....!!!  
       आवडते लेखक : सचिन गिरी आणि बर्नाड श्वा
       नावडते लेखक : लक्ष्मीकान्त बोंगले आणि टोलस्टोय
      आवडते लोक : फेसबुक वरील माझे स्टेटस लाइक करणारे

 --- अनामि'क'  ( या नावाने लिहायचे ठरवले आहे. किंवा आता 'लिहिले आहे'.)  

2 comments: